जळगावात चोरट्यांनी सिलिंग फॅनसह अ‍ॅम्प्लीफायर लांबवला


जळगाव (9 मार्च 2025) : क्लासरूमचे कुलूप तोडून आत एण्ट्री करत चोरट्यांनी म्प्लीफायर व सिलिंग फॅन असा सुमारे 15 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. शहराचे उपनगर पिंप्राळ्यातील अँग्लो उर्दू हायस्कूल, पॉवर हाऊसजवळ ही घटना सोमवारी (3 मार्च ) उघडकीस आली. या प्रकरणी शुक्रवारी ( 7 मार्च) रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेख हकीम अब्दुल हमीद (58, रा.सावकरनगर, पिंप्राळा) हे शिक्षक आहेत. उर्दू हायस्कुल पॉवर हाउस जवळ त्यांचा क्लास रुमआहे. कुलूप बंद असताना चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडुन प्रवेश केला. सुमारे 10 हजार रुपये किमतीचा प्लीफायर तसेच पाच हजार किमतीचा सिलींग फॅन असा सुमारे 15 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान घडली. तपास हवालदार सुशील चौधरी हे करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !