साकळीत घरात अनधिकृतपणे प्रवेश करून 70 हजारांची रोकड महिलेने लांबवली


यावल (17 जून 2025) : यावल तालुक्यातील साकळी या गावातील आंबेडकर नगरात एका महिलेच्या घरात गावातीलच एका महिलेने प्रवेश करीत डब्यात ठेवलेली 70 हजारांची रोकड लांबवण्यात आली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके
साकळी गावातील आंबेडकर नगरात मनीषा विजय जंजाळे (40( वास्तव्यास असून त्यांच्या घरात साकळी गावातीलच एक महिला अधिकृतपणे घराचे कुलूप उघडून आत शिरली व तिने घरातील डब्यात ठेवलेले 70 हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !