डोक्यावर बँकेचे कर्ज ; हताश झालेल्या अजनाडच्या तरुण शेतकर्याची आत्महत्या
रावेर (20 मार्च 2025) : रावेर तालुक्यातील अजनाड गावातील तरुण शेतकर्याने कर्जाला कंटाळून एका लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची मृत्यूची नोंद करण्यात आली. योगेश भागवत चौधरी (33) असे मृताचे नाव आहे.
अजनाड गावातील योगेश भागवत चौधरी (33) या तरुण शेतकर्यावर कर्जाच्या बोजा वाढल्याने त्यांने कंटाळून स्वत:च्या अजनाड शिवारातील शेत गट क्रमांक 195/2 मध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास घेतला. बुधवारी रात्री आठ वाजेपूर्वी हा प्रकार घडला. योगेश चौधरींवर कॅनरा बँकेचे दिड लाखांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत प्राथमिक अहवाल तलाठी गोपाळ भगत यांनी तयार केला. याप्रकरणी यशवंत भागवत चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल योगेश महाजन करीत आहेत.





