फैजपूरात सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळेंची मोठी कारवाई : अवैधरित्या चालणारा गुरांचा कत्तलखाना नष्ट
Major action by Assistant Inspector Rameshwar Motale in Faizpur: Illegal cattle slaughterhouse destroyed फैजपूर (3 एप्रिल 2025) : फैजपूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मिल्लत नगरातील मशिदीजवळील एका पत्र्याच्या शेडमधून 52 हजारांच्या गोमांसह तिघांना पकडले. ही कारवाई बुधवार, 2 एप्रिल रोजी करण्यात आली. याप्रकरणी तिांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना मिल्लत नगरातील एका शेडमध्ये कत्तलखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले.
52 हजारांचे गोमांस जप्त
पथकाने छापा टाकल्यानंतर ईकराम शेख नईम कुरेशी (21, मिल्लत नगर, फैजपूर), वसीम शेख अब्दुल रहिम कुरेशी (46, कुरेशी मोहल्ला, फैजपूर), शेख मुस्तकिन शेख कलीम (40, कुरेशी मोहल्ला, फैजपूर) यांच्याकडे 220 किलो वजनाचे व 39 हजार 600 रुपये किंमतीचे गोमांस, पाचशे रुपये किंमतीचे 23 किलो वजनाचे बैलाचे चामडे, एक हजार चारशे रुपये किंमतीचा वजनकाटा, 300 रुपये किंमतीची कुर्हाड, 200 रुपये किंमतीची सुरी, 10 हजार रुपये किंमजीचा जिवंत गोर्हा असा एकूण 52 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पशूवैद्यकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत गोमांसाचे नमूने घेवून उर्वरीत मांसाचे दफन करण्यात आले. हवालदार रवींद्र मोरे यांच्या फिर्यादीवरून तिघा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, फैजपूर विभागाचे प्रभारी उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, उपनिरीक्षक विनोद गाभणे, एएसआय अरुण नमायते, हवालदार रवींद्र मोरे, हवालदार सलीम तडवी, हवालदार अनिल पाटील, हवालदार मोती पवार, हवालदार देवेंद्र पाटील, हवालदार ज्ञानेश्वर चौधरी, महिला हवालदार मदिना तडवी, नाईक समाधान पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत चिरमाडे, कॉन्स्टेबल राहुल नावकर, होमगार्ड आदींच्या पथकाने केली.




