अमळनेरातील संशयीत गावठी कट्टा व काडतूससह जाळ्यात

अमळनेर (6 जून 2025) : अमळनेर पोलिसांनी एका तरुणाकडून पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले..
गोपनीय महितीवरून कारवाई
गुरुवार, 5 जून रोजी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की, क्रीडा संकुलाच्या भिंतीआड एक जण बेकायदेशीर पिस्टल बाळगून आहे. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, निलेश मोरे, विनोद संदानशिव, सिद्धांत शिसोदे याना बोलावून पिस्टल बाळगणार्या इसमाला पकडण्याचे आदेश दिले. पोलिसांनी साडे सात वाजेच्या सुमारास शोध घेण्याचा प्रयत्न केला असता क्रीडा संकुलाच्या भिंतीआड एक तरुण पोलिसांना पाताचा पळू लागला.