हजूर साहिब नांदेड ते फिरोजपूर दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस ; 15 जूनपासून सुरूवात
New weekly express between Hazur Sahib Nanded and Ferozepur; starting from June 15 भुसावळ (13 जून 2025) : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने हजूर साहिब नांदेड-फिरोजपूर कॅन्ट जंक्शन दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस 15 जून पासून सुरू होणार आहे. गाडी क्रमांक 14621 व 14622 असा नंबर राहणार असून दोन्ही दिशांनी वेगवेगळ्या दिवशी ही गाडी नियमित धावणार आहे.
या स्थानकावर थांबा
गाडी क्रमांक 14621 साप्ताहिक एक्सप्रेस 15 जूनपासून प्रत्येक रविवार हजूर साहिब नांदेड येथून सकाळी 11.50 वाजता सुटेल तर मंगळवारी पहाटे 4.30 वाजता फिरोजपूर कॅन्ट येथे पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 14622 साप्ताहिक एक्सप्रेस 13 जूनपासून प्रत्येक शुक्रवारी फिरोजपूर कॅन्ट येथून दुपारी 1.25 वाजता सुटणार असून रविवारी सकाळी 3.30 वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल. ही गाडी पूर्णा, परभणी, सेलू, जालना, औरंगाबाद, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, विदिशा, बीना, झाशी, ग्वाल्हेर,आग्रा कँट,मथुरा, फरीदाबाद, दिल्ली सफदरजंग, शकूरबस्ती, बहादुरगड, रोहतक, धमतन साहिब, जिंद, जाखल, मानसा, भटिंडा, कोट कपुरा आणि फरीदकोट येथे थांबणार आहे.


या गाडीला 2 द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, 4 तृतीय श्रेणी वातानुकुलीत, 3 इकॉनॉमी, 7 स्लीपर क्लास, 4 सामान्य द्वितीय श्रेणी डबे,1 सामानवाहू व गार्ड ब्रेक व्हॅन, 1 बॅटरी कार असे एकूण 22 डब्यांची संरचना असलेल्या या गाडीमुळे महाराष्ट्र व उत्तर भारतातील प्रवाशांना अधिक सोयीचे होणार आहे.





