राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप


Distribution of school supplies on the occasion of Raj Thackeray’s birthday भुसावळ (15 जून 2025) : मनसेचे सर्वेसर्वा राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, उपाध्यक्ष विनोद पाठक यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर महादेव मंदिर तुकाराम नगर शिवपुर कन्हाळा रोड, भुसावळ येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्तिक या लहान बालकाच्या हातून केक कापण्यात आला. त्यानंतर सर्व उपस्थित मुला-मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी दीपक सोनवणे तालुकाध्यक्ष वाहतूक सेना यांनी उपस्थित लहान मुलं व त्यांच्या पालकांना सांगीतले की शालेय साहित्य सोबत जे बालमित्र पुस्तक देण्यात आले त्या बालमित्र पुस्तक याच्यासाठी देण्यात आले की तुम्ही तुमच्या मुलांना जरी इंग्रजी शाळेमध्ये शिकवत असाल तरी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना हे पुस्तक वाचण्यासाठी द्यावे जेणेकरून त्यांना मराठी समजण्यात मदत होईल.

यांची होती उपस्थिती
भुसावळ तालुकाध्यक्ष तुषार वाढे, तालुकाध्यक्ष वाहतूक सेना दीपक सोनवणे, तालुका सचिव विलास कोळी, तालुका उपाध्यक्ष दशरथ सपकाळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक भंगाळे, तालुकाध्यक्ष म.न.वी.से.
प्रणय भागवत, शहर अध्यक्ष म.न. वी.से. वैभव सुरवाडे, रोहित सपकाळे, राजेंद्र भंगाळे, मोहन पाटील, राजपूत काका आदी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !