कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या गोळीबारात ठार


Notorious criminal killed in police firing सोलापूर (15 जून 2025) : पुण्यातील काळेवाडी पोलिस स्टेशन परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेला शाहरुख रहीम शेख (रा. हडपसर, पुणे) हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे. ही घटना सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळजवळ घडली.

सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी येथील नरोटे वस्तीत गुन्हेगार शेख हा राहत असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांनी रात्री घटनास्थळी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पोलिसांवर पिस्टलमधून प्रारंभी पोलीसांवर फायर केले. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.े.


पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीचा सराईत गुंड आणि मोका अंतर्गत फरार असलेला आरोपी शाहरुख ऊर्फ अट्टी रहीम शेख (23, रा. गल्लीनं. 23/ए, सय्यद नगर, हडपसर) याचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळ लांबोटी गावात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. शाहरुख हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. हडपसर, वानवडी आणि कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी केलेल्या मोका कारवाईनंतर तो फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला आरोपी शाहरुख हा सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावातील नातेवाईकांकडे लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर गुन्हे शाखेचे कर्मचारी त्याला पकडण्यासाठी शनिवारी मध्यरात्री लांबोटी गावात गेले. पहाटे अंधारात पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर शाहरुखने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार करत त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. या चकमकीत शाहरुख गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !