भोरगाव लेवा पंचायतला जागा मिळविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार : मंत्री संजय सावकारे

The government will make every effort to get a seat for Bhorgaon Leva Panchayat: Minister Sanjay Savkare भुसावळ (16 जून 2025) : भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे भुसावळ विभागातर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात, त्याचे हे उपक्रम वेगवेगळ्या जागेत होत असल्याने शासनाकडून त्यांना हक्काची जागा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आपण प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले. ते भोरगाव लेवा पंचायततर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्याच्या गौरव समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुटुंबनायक ललित पाटील उपस्थित होते. स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे दीपक चौधरी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहनासाठी उपक्रम
शहरातील खाचणे हॉलमध्ये आयोजितत कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित होते. प्रस्तावना विभाग प्रमुख सुहास चौधरी यांनी केली. यात त्यांनी सांगितले की, मुला-मुलींना प्रोत्साहन मिळण्यासाठी व त्यांनी त्यांच्या भावी आयुष्यात असेच यश संपादन करावे हा या कार्यक्रमा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले.

पुढचा कार्यक्रम नूतन वास्तूत
मंत्री संजय सावकारे यांनी भोरगांव लेवा पंचायतीच्या कार्याचे कौतुक करून या पुढचा कार्यक्रम पंचायतीच्या वास्तूतच होईल, असे आश्वासन दिले व त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला. भोरगाव लेवा पंचायतच्या संचालिका व समुपदेशिका आरती चौधरी यांनी मुलांना व पालकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, मुला-मुलींसाठी विविध संधी उपलब्ध आहेत त्या सांगून , त्याचा फायदा घ्या, फक्त मेहनतीनेच यश मिळते. असे सांगितले. प्रमुख दीपक चौधरी म्हणाले की, अभ्यासात सातत्य असायला हवे. तरच यश मिळते.
यावेळी भोरगांव भुसावळ विभागाचे संचालक आर.जी.चौधरी, महेश फालक, मंगला पाटील, कावेरी चौधरी, शरद फेगडे आदी उपस्थित होते. भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेच्या महिला विभागाच्या दीपाली बर्हाटे, प्राची राणे, सुनीता पाचपांडे, मनिषा चौधरी, मीनाक्षी धांडे, वैशाली महाजन यांच्यासह भोरगाव लेवा युवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. समाजातील वरिष्ठ मामा पाचपांडे, अरुण पाटील, सुरेश हंबर्डीकर, प्रवीण पाटील, निळकंठ भारंबे यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक व समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. ज्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट व शिल्ड राहिले असेल त्यांनी ते भोरगाव लेवा पंचायतच्या कार्यालयातून घेऊन जाण्याचे आवाहन संचालक परीक्षित बर्हाटे, चेतन पाटील यांनी केले आहे.
300 गुणवंत विद्यार्थ्याचा केला गौरव
भोरगांव लेवा पंचायतीतर्फे 300 विद्यार्थी विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. त्यात शाळेत पहिले आलेल्या अन्य समाजाच्या मुलामुलींचा सुध्दा समावेश आहे. यावेळी कौशल प्रमोद पाटील हा एमपीएससी परीक्षेत पास होऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणून झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अथर्व दीपक महाजन, आयआयटी परिक्षेत 99.93 टक्के मार्क मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. ज्ञानज्योती महाविद्यालय खडका येथील दहावीची विद्यार्थीनी धनश्री चौधरी हीने मनोगत व्यक्त केले.
