भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये नवागतांचे स्वागत


Welcome to new students at Tapti Public School in Bhusawal भुसावळ (16 जून 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांचे भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी शाळेत येणार्‍या सर्व बाल-गोपाल विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व चॉकलेट तसेच टोपी व पेन्सिल भेट दिली.

शाळेचा परिसर सजवण्यात आला होता. लहान मुलांसाठी कार्टून व फुगे लावून सर्व वर्ग सजवण्यात आले तसेच मोठ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सजावट करण्यात आली तर इमोजी बनवण्यात आले. शाळा परिसरात स्वच्छता करण्यात आली होती. विद्यार्थी हे गणवेशात व शिस्तीने शाळेत आलेले दिसून आले. यावेळी शिक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांचे स्वागत करीत शाळेचा पहिला दिवस साजरा केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !