भुसावळातील मेहता प्राथमिक विद्यामंदिरात शाळा प्रवेशोत्सव

School entrance ceremony at Mehta Primary Vidya Mandir in Bhusawal भुसावळ (16 जून 2025) : शहरातील श्री.र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिात सोमवार, 16 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी मुख्याध्यापिका रिता शर्मा तसेच पालक प्रतिनिधी मनोज बालू, रवी कुमार विश्वकर्मा, समीना गवली, पूजा बालू उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना भेटवस्तू, पुष्पगुच्छ देण्यात आले. पालकांचे सुद्धा स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले त्या शिवाय प्रभात फेरी, वृक्षारोपण, रोप वाटप इत्यादी उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांचे विकासासाठी या शैक्षणिक वर्षात विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन रिता शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन दीपक कुलकर्णी तर आभार दीपक तेली यांनी मानले. शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.