जळगावात अवैध गॅस रिफिलिंग : पोलिसांच्या कारवाईत 61 सिलेंडर जप्त
Illegal gas refilling in Jalgaon : 61 cylinders seized in police action जळगाव (17 जून 2025) : शनीपेठ पोलिसांनी मोहन टॉकीज परिसरातील एका घरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग होत असताना छापा मारत 61 सिलेंडर जप्त केले. या कारवाईने अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शनिपेठ पोलिसांनी 28 व्यावसायिक सिलिंडर (10 भरलेले, 18 रिकामे) आणि 33 घरगुती सिलिंडर (13 भरलेले, 10 रिकामे) जप्त केले आहेत. वाहन चालक आदेश राजू पाटील, राहुल नारायण सोनवणे आणि राकेश नारायण सोनवणे यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.








