खापरखेड्यातील प्रौढाची नैराश्यातून आत्महत्या

An adult in Khaparkheda commits suicide due to depression अमळनेर (18 जून 2025) : नैराश्यातून खापरखेडा प्र.डा.येथे एका प्रौढाने गळफास घेतला. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुरेश देवाजी भिल (45) असे मयताचे नाव आहे.
आपल्या गावी सुरेश यांनी राहत्या घरी घराच्या छताला गळफास घेतला. ही घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

याबाबत अनिल सोनवणे यांनी मारवड पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.ल तपास हवालदार संजय सूर्यवंशी करीत आहेत.
