जळगावात दुकान फोडून चोरट्यांनी संगणक संच लांबवले


Thieves break into shop in Jalgaon, steal computer sets जळगाव (18 जून 202) :कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून चोरट्यांनी संगणकाचे तीन संच चोरून नेले. ही घटना 14 जून रात्री ते 15 जून रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धीविनायक चौकात घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्रीच्या सुमारास चोरी
सिद्धीविनायक चौकामध्ये मनीषा विशाल पाटील (43) यांचे घराशेजारीच कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. तेथे मुलांचे क्लास घेतले जातात. शनिवार, 14 जून रोजी रात्री 8 वाजता इन्स्टिट्यूट बंद केले होते. मध्यरात्री चोरट्यांनी इन्स्टिट्यूटच्या दरवाजाचा कडीकोयंडा कापला. आतमध्ये प्रवेश करून 3 मॉनिटर, 3 सीपीयू, 3 की बोर्ड, 3 माऊस व केबल आदी साहित्य चोरून नेले. रविवार, 15 रोजी सकाळी सात वाजता हा प्रकार लक्षात आला.


या प्रकरणी मनीषा पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रामकृष्ण इंगळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !