तरुणाचा भडगावातील गॅरेज चालकावर चाकू हल्ला


Youth attacks garage driver in Bhadgaon with knife भडगाव (18 जून 202) : शहरातील बाळद रस्त्यावर गॅरेज दुकान उघडत असताना एक तरुण तिथे आला व त्या गॅरेज मालकाच्या मोबाईलवर आलेल्या इंस्टाग्रामवर मेसेजबाबत राग अनावर झाल्याने थेट त्याच्या डोक्यावर व मांडीवर चाकू हल्ला करत त्याला गंभीर जखमी करण्यात आले. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे नेमके प्रकरण
महेश विश्वनाथ पाटील (27, रा.बाळद बु.।, ता.पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बाळद खुर्द येथील प्रवीण शंकर कोळी हा माझा मित्र आहे. त्याचा लहान भाउ विवेक शंकर कोळी यास मी ओळखतो. प्रववण शंकर कोळी व त्याची पत्नी योगीता कोळी यांच्यात घरगुती कारणावरुन सुमारे 15 दिवसापूर्वी वाद झाले होते. या कारणावरुन योगीता कोळी ही तिच्या दोन्ही मुलींना घेवुन तिच्या आई वडीलांकडे निघुन गेली होती. त्यानंतर प्रवीण शंकर कोळी हा योगीता कोळी हिचे आई -वडिलांकडे जावुन त्याच्या दोन्ही मुली घरी बाळद खु.येथे घेउन आला होता. म्हणून योगीता कोळी हिने मला माझ्या मोबाईलवर फोन करुन विचारले होते की, माझ्या मुली घरी आल्या आहेत काय व व्यवस्थित आहे काय तसेच योगीता कोळी हिने मला मुलींबाबत इंस्टाग्राम वर मेसेज केला होता.


संशयीताविरोधात गुन्हा दाखल
इंस्टाग्रामवरील मॅसेज बाबत प्रवीण कोळी याचा लहान भाऊ विवेक कोळी यास माहित झाल्याने त्यास त्याचा राग आला होता. त्याबाबत त्याने गावातील मुलांना सांगितले की, महेश पाटील यास सोडणार नाही असे सांगत आज सकाळी 10.15 वाजता भडगाव-बाळद रोड वरील माझ्या गॅरेजवर विवेक शंकर कोळी हा माझा जवळ आला त्याने त्याचे हातातील धारदार चाकुने माझ्या पाठीवर, मांडीवर, डोक्यावर मारून दुखापत केली. मला शिविगाळ करुन आज तुला जिवंत सोडनार नाही, तुला मारुन टाकेन अशी धमकी दिली. विवेक शंकर कोळी याच्याविरुध्द भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार प्रदीप चौधरी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !