भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय योगदिवशी विशेष योगाभ्यास
भुसावळ (21 जून 2025) : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे शनिवार, 21 जून रोजी अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. शहरातील माय फिटनेस जिमच्या मोकळ्या मैदानावर हा कार्यक्रम सकाळी 5.45 ते 6.45 या वेळेत झाला. यावेळी असोसिएशनचे बहुसंख्य नियमित धावपटू उपस्थित होते.
यावेळी आयुष मंत्रालयाच्या योगा मास्टर (लेव्हल – 6) परीक्षा उत्तीर्ण योगशिक्षिका पूनम कुलकर्णी यांनी योगाचे महत्त्व सांगून उपस्थितांकडून विविध आसणे करवून घेतली. शिवाय यावर्षीच्या एक पृथ्वी एक आरोग्य या संकल्पनेला अनुसरुन योग म्हणजे शरीर व मन परिवर्तनाची निरंतर चालणारी प्रक्रिया आहे व नियमित योगा करणारी व्यक्ती कृतज्ञ बनते असे देखील त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नीलिमा नेहेते होत्या. सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी केले.


यशस्वीतेसाठी प्रमोद धनगर, छोटू गवळी, मंगेश चंदन, प्रशांत चौधरी, सारंग चौधरी, संजय तिवारी यांचे सहकार्य लाभले. डॉ.चारुलता पाटील, स्वाती फालक, किर्ती मोतळकर, रिना परदेशी, एकता भगत, गुंजन गुप्ता, प्रविण वारके, सुयश न्याती, प्रकाश अटवाणी, माधुरी चौधरी, सीमा पाटील, जयश्री चौधरी, सुनीता सिंग, चित्रा करकरे, प्रिती शुक्ला, शिला कश्यप, सविता घाटे, सायली बेंडाळे, गरिमा न्याती यांची प्रमुख उपस्थिती होती.






