चोपडा तालुक्यात अल्पवयीन तरुणी अत्याचारातून गर्भवती : तरुणाला अटक


Minor girl becomes pregnant due to rape in Chopda taluka : Youth arrested चोपडा (21 जून 2025) : अल्पवयीनाशी प्रेमसंबंध ठेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्यानंतर 14 वर्षीय पीडीता गर्भवती राहिली. या प्रकरणी गुरूवार, 19 जून रोजी मध्यरात्री एक वाजता चोपडा शहर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली.

असे आहे प्रकरण
चोपडा तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन पीडीता वास्तव्याला आहे. ऑक्टोबर 2024 पासून परिसरात राहणारा ज्ञानेश्वर उर्फ दादू सुनिल भील (21) याने पीडीतेसोबत प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर शारिरीक संबंध ठेवले. अत्याचारातून पीडीता गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पीडीता मुलीसह तिच्या नातेवाईकांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी ज्ञानेश्वर भील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !