वृद्धाची निर्घृण हत्या : कारण वाचून बसेल धक्का !


Brutal murder of an elderly man: The reason will be worth reading पंढरपूर (3 जुलै 2025) : पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंधाची माहिती इतरांना सांगेल या भीतीने एका वृद्धाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सूर्यकांत देवाप्पा रेवे (65, रा.सध्या ओझेवाडी, ता.पंढरपूर, जि.सोलापूर) असे खून झालेल्या वृद्धाचे तर कुमार दिगंबर जाधव (रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर) असे आरोपीचे नाव आहे.

असे आहे प्रकरण
आरोपी कुमार जाधवचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे मयत सूर्यकांत रेवे यांना माहित होते. ही माहिती इतर नातेवाईकांना सांगतील या भीतीने आरोपी याने सूर्यकांत रेवे यांच्या गळ्यावर, पोटावर, छातीवर चाकूने वार करून ठार मारले.








या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले व वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांनी आरोपीला अटक केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !