सहा लाखांची लाच घेताना माजलगाव मुख्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात


Majalgaon Chief Officer caught by ACB while taking bribe of Rs. 6 lakhs बीड (10 जुलै 2025) : बीडच माजलगाव पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना सहा लाखांची लाच घेण्यात आल्यानंतर अटक करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

असे आहे लाच प्रकरण
खास सूत्रांच्या माहितीनुसार, एका कंत्राटदाराकडे 12 लाखांची मागणी करण्यात आली व त्यापैकी सहा लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

एसीबीच्या तपासणी पथकाकडून मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्या घराची झडती घेतली तर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !