भुसावळ विभागाच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी संदीप गावीत तर मुक्ताईनगर विभागाची धूरा बी.जी.रोहोम यांच्याकडे


Sandeep Gavit appointed as new Deputy Superintendent of Police of Bhusawal division भुसावळ (31 जुलै 2025) : गृह विभागाने राज्यातील राज्य पोलीस सेवेतील 65 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. याबाबतचे आदेश गृह विभागाचे सचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहेत.

भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची बढतीवर पुणे टास्क फोर्समध्ये बदली झाल्यानंतर भुसावळात कुणाची नियुक्ती होते ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते मात्र जळगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांची भुसावळ विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याने भुसावळ विभागाला पुन्हा एका नव्या दमाचा अधिकारी लाभला आहे.


मुक्ताईनगर पोलीस उपअधीक्षकपदी बी.जी.रोहोम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोहोम हे अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी असून त्यांनी यापूर्वी जिल्ह्यात कामकाज सांभाळले आहे शिवाय जळगाव गुन्हे शाखेच्या प्रभारीपदीदेखील कामकाज पाहिले आहे. जळगाव जिल्ह्यात काम केल्याचा फायदा त्यांना आता मुक्ताईनगर उपविभागाची धूरा सांभाळताना होणार आहे.

दरम्यान, चाळीसगाव विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी विजय ठाकूरवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिस्तप्रिय अधिकारी असलेले ठाकूरवाड हे यापूर्वी जिल्ह्यातच पोलीस निरीक्षक असल्याने त्यांना जिल्ह्याची बारकाईने माहिती असल्याने त्याचा फायदा त्यांना काम करताना निश्चितपणे होणार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !