भुसावळात श्री संत नरहरी महाराज जन्मोत्सवानिमित्त 10 रोजी गुणवंतांचा गौरव
On the occasion of the birth anniversary of Shri Sant Narahari Maharaj, meritorious people were felicitated in Bhusawal on the 10th. भुसावळ (6 ऑगस्ट 2025) : शहरातील नवअहिर सुवर्णकार समाज मंडळातर्फे श्री संत नरहरी महाराज जन्मोत्सवानिमित्त रविवार, 10 रोजी सकाळी 10 वाजता समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच समाजातील दागिने घडवणार्या सुवर्णकार बांधवांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
यांची असेल प्रमुख उपस्थिती
शहरातील पांडुरंग टॉकीज मागील व्यंकटेश बालाजी मंदिरात रविवारी सकाळी 10 वाजता होणार्या कार्यक्रमास वस्त्रोद्योग कॅबिनेट मंत्री तथा भंडारा पालकमंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

समाजबांधवांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर
कार्यक्रमात श्री संत नरहरी महाराज जन्मोत्सवानिमित्त कांताई नेत्रालयातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत नेत्रतपासणी शिबिर सकाळी नऊ ते 10.30 वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी होईल.
सुवर्णकार बंधू-भगिनींनी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि संपूर्ण कार्यकारिणी तसेच नवअहिर सुवर्णकार समाज मंडळ, भुसावळतर्फे करण्यात आले आहे.




