भुसावळात काश्मिरी सफरचंदांची आवक वाढल्याने भावात घसरण
Prices of Kashmiri apples in Bhusawal fall due to increased arrival भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : भुसावळ शहरात श्रावणापासून फळांची मागणी वाढली आहे. श्रावणाच्या सुरवातीला 240 रुपये किलोने विदेशी व काश्मीरी सफरचंदाची विक्री झाली. मात्र आता काश्मिरमधून नवीन बहाराचे सफरचंदाची आवक वाढली आहे. यामुळे दरात घसरण होऊन सध्या बाजारात 120 ते 160 रुपये किलोने सफरचंदाची विक्री होत आहे. आगामी काळात हे दर 80 ते 100 रुपये किलोवर येवू शकतील.
शहरात केळीसह डाळींब, पेरू, पपई, चिकू, नाशपती, पेर आदींसह विदेशी फळांची आवक वाढली आहे.
शहरात सफरचंदाचे भाव गेल्या पंधरवड्यात 240 रुपये किलोपर्यंत होते. मात्र सध्या पहिल्या टप्प्यात काश्मीरच्या नवीन बहाराच्या सफरचंदांची आवक वाढत आहे. यामुळे दरात घसरण झाली आहे. सध्या हे दर 120 ते 160 रुपये किलो आहेत. गणेशोत्सवात आवक वाढून पून्हा वाढणार असल्याने दरात घसरण होईल. सध्या बाजारात डाळींब, पेरु, चिकू, पपई, टरबुज, खरबुज, केळी आदींसह विविध फळांची मागणी कायम आहे.

विदेशी फळांना मागणी
सध्या बाजारात युएसएचे द्राक्षे 350 रुपये किलो, जर्दाळू 200 रुपये, किवी 120 रुपये तीन नग या प्रमाणे विक्री होत आहेत. सध्या बाजारात स्थानिक व थायलंड, चिनमधूनही ड्रॅगन फ्रुट बाजारात विक्रीसाठी आले आहेत. साधारण 100 रुपये किलोने याची विक्री होत आहे.
असे आहेत प्रती किलोचे दर
नासपती 100, पेर 100 ते 120, केळी 30 रुपये डझन, सफरचंद शिमला 160, जर्दाळू 200, 3 नगांची बॉक्स पॅकींग किवी 120, डाळींब 120 ते 160, पपई 40, अननस 60 ते 80, नासपती 100 ते 120, टरबुज व खरबुज 40 रुपये व आंबे 150 ते 160 रुपये किलोने विक्री होत आहेत.
सफरचंदाचे भाव कमी होणार
दरवर्षी गणेशोत्सवाच्या चार ते पाच दिवस आधी मोठ्या प्रमाणात काश्मीरी सफरचंदांची आवक होते. यामुळे दरात घसरण होते. सर्वसाधारण प्रतीचा माल या काळात 100 रुपये दर उच्चदर्जाचा माल 120 ते 150 रुपये किलोपर्यंत राहू शकेल. अर्थात आवक किती होते? यावरही भाव अवलंबून राहतील, असे फळ व्यापारी रिझवान बागवान म्हणाले.




