भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात वृक्षांना बांधली राखी


Rakhi tied to trees at De.N.A. Bhole College in Bhusawal भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात रक्षाबंधन हा सण आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सांस्कृतिक आणि पर्यावरण संवर्धन समितीने संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राचार्य परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते.

एकात्मतेचा संदेश देणारा सण
प्राचार्य फालक म्हणाले की, रक्षाबंधन हा नात्यांचे संरक्षण, प्रेमाचा उत्सव आणि एकात्मतेचा संदेश देणारा सण असतो. केवळ रक्ताच्या नात्यापुरता सीमित न राहता मैत्री, आपुलकी आणि सामाजिक नात्यांमध्ये ही राखी बांधली जाते. त्यानिमित्त सामाजिक ऐक्य, विश्वास आणि परस्परांविषयी आदर निर्माण होतो. आज या निमित्ताने पर्यावरणाशी नाते जोडत आपण विद्यार्थी आणि वृक्ष यांच्याशी नाते जोडून ते जपू या म्हणजे पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल.


प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना तसेच वृक्षांना ही राखी बांधून त्यांचे पालकत्व स्वीकारून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.आरती नवघरे, प्रा.जागृती सरोदे, प्रा.सुशीला भाटे, यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !