जिल्ह्यात चार मंत्री मात्र प्रवासी हतबल ; भुसावळ-मुंबई पॅसेजर बंद : इगतपुरी मेमू कसार्‍यापर्यंत वाढवाण्याची अपेक्षा


भुसावळ (19 ऑग्स्ट 2025) : कोरोना काळात बंद झालेली भुसावळ-मुंबई पॅसेजर गाडी अजूनही पुन्हा सुरू करण्यात आली नाही. भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसही मनमाडमार्गे वळवल्याने मुंबई-कल्याणकडे जाणार्‍या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे इगतपुरी मेमू गाडीचा कसार्‍यापर्यंत विस्तार करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मेमूला कसार्‍यापर्यंत वाढवण्याची मागणी
पूर्वी सकाळी श्रज्ञी वाजता भुसावळहून सुटणारी मुंबई पॅसेजर गाडी प्रवाशांना सोयीची होती मात्र कोरोना काळात ती बंद करून कायमस्वरूपी रद्द करण्यात आली. सध्या त्या जागी इनगतपुरी मेमू चालते परंतु ती कसार्‍यापर्यंत वाढविल्यास प्रवाशांना तेथून लोकलने मुंबईत सहज पोहोचता येईल. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रवासी वर्गात नाराजी आहे.


राजकीय हस्तक्षेपाने हुतात्मा धावतेय अमरावतीतून
भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस पूर्वी कल्याणमार्गे धावत होती. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे ती अमरावतीतून सोडून मनमाडमार्गे पुण्याकडे वळविण्यात आली. यामुळे भुसावळ-कल्याणदरम्यान प्रवास करणार्‍यांना मोठी गैरसोय झाली आहे. आता ही गाडी भुसावळहून पहाटे (मध्यरात्री) 2.30 वाजता सुटते, ज्यामुळे प्रवासी संख्या घटली आहे.
स्थानिक प्रवासी तसेच लोकप्रतिनिधींकडून रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून भुसावळ-मुंबई पॅसेजर पुन्हा सुरू करावी किंवा इगतपुरी मेमूचा कसार्‍यापर्यंत विस्तार करावा, अशी ठाम मागणी होत आहे.

चार मंत्री तरीही उपेक्षा कायम
एक केद्रीय मंत्री तर तीन कॅबीनेट मंत्री जिल्ह्याला लाभलेले असतांना सुध्दा भुसावळ ते मुंबई पॅसेजर ही गाडी सुरू होऊ शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्यास मुंबई पॅसेंजर सुरू होऊ शकते नाही तर ईगतपुरी मेमू कसार्‍यापर्यत विस्तार करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !