डांभूर्णीतील डॉ.दिवाकर खंडू चौधरी विद्यालयातील सनी कोळीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड


Sunny Koli from Dr. Diwakar Khandu Chaudhary School, Dambhurni, selected for state-level competition यावल (30 ऑगस्ट 2025) : जळगाव जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन व भुसावळ तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय व 23 वयोगट अँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन भुसावळ रेल्वे स्पोर्टस ग्राउंड येथे शुक्रवारी करण्यात आले. या स्पर्धेमध्ये डॉ.दिवाकर खंडू चौधरी विद्यालय, डांभूर्णी येथील खेळाडू सनी पद्माकर कोळी इयत्ता दहावी हा 600 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम आला. त्याची निवड पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटीक्स स्पर्धेसाठी करण्यात आली.

यशानंतर शुभेच्छांचा वर्षाव
त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल नवयुवक विद्या प्रसारक मंडळ, डांभूर्णीचे अध्यक्ष डॉ.विवेक चौधरी यांच्याहस्ते विद्यालयात सनी कोळीचा सत्कार करण्यात आला व अध्यक्षांनी या निवडीबद्दल त्याला भेट व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक उमाकांत महाजन, पर्यवेक्षक डी.एस.ठाकूर, क्रीडा शिक्षक जे.ए.फिरके व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद व सनीचे वडील पद्माकर कोळी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !