मराठा समाजाला आरक्षण : भुसावळात एकजुट होत समाजबांधवांनी केला जल्लोष


Reservation for Maratha community : Community members unite and celebrate in Bhusawal भुसावळ (3 सप्टेंबर 2025) : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मुंबईत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात करताच सरकारने नमते घेत सर्व मागण्या मान्य केल्या. मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय झाल्यानंतर शहरातील मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला. यावेळी सकल मराठा समाजबांधवांनी शहरातील रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले

यांची होती उपस्थिती
यावेळी रवींद्र ढगे, मुकेश गुंजाळ, कृष्णा शिंदे, संजय कदम, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, तुषार पाटील, ईश्वर पवार, शैलेश ठाकरे, पंकजराव हिंगणे, दत्तात्रेय मराठे, राजेंद्र पावशे, सौरभ पवार, विकास सोनवणे, महेश पवार, निलेश हिंगणे, यज्ञेश पंकजराव हिंगणे, निखील चंद्रकांत टकले, गजानन दाभट, संदीप पाटील, हितेश माधवराव टकले व इतर मराठा समाजबांधव उपस्थित होते.






 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !