भुसावळात अमरदीप चौकातील महावितरणच्या ट्रान्सफार्मरला आग : वीजपुरवठा गुल

परिसरातील नागरिकांनी माती, वाळू टाकून मिळवले आगीवर नियंत्रण


Fire breaks out at Mahavitaran transformer at Amardeep Chowk in Bhusaval : Power supply disrupted भुसावळ (4 सप्टेंबर 2025) : शहरातील खडका रोडवरील अमरदीप चौकातील महावितरणच्या ट्रान्सफार्मरला अचानक दाब वाढल्याने आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली. परिसरातील नागरिकांनी धाव घेवून पेटत्या ट्रान्सफार्मरवर माती टाकून आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. तो सायंकाळी उशिरापर्यंत सुरु झाला नव्हता.

उत्सवात विजेची मागणी वाढली
शहरात वीजेची मागणी वाढत असल्याने वीज ट्रान्सफार्मर दाब वाढत आहे. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान अमरदीप चौकातील महावितरणच्या ट्रान्सफार्मरला यामुळे अचानक आग लागली. ट्रान्सफार्मरच्या परिसरात यावेळी कोणीही नसल्याने अघटीत घटना घडली नाही. काही क्षणात आगीच्या ज्वाळा वाढून परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी धाव घेवून पेटत्या ट्रान्सफार्मरवर माती व वाळू टाकली. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.


काही जणांनी महावितरण कंपनीलाही सूचित केले. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. हा पुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. शहरातील अनेक भागांमध्ये यापूर्वीही सातत्याने विजेचा दाब वाढल्याने महावितरणचे ट्रान्सफार्मर पेटण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे दाब विभागून नवीन ट्रान्सफार्मर बसविणे आवश्यक आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !