स्वामीनारायण गुरुकुलमध्ये गणेशोत्सवानिमित्त स्पर्धा


Competition on the occasion of Ganeshotsav at Swaminarayan Gurukul भुसावळ (4 सप्टेंबर 2025) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल शाळेत गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले

गणेशोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामीनारायण गुरुकुल, साकेगाव विद्यालयाचे अध्यक्ष परमपूज्य के.के.शास्त्रीजी यांच्या प्रेरणेने स्मरणशक्ती, चित्रकला स्पर्धेत गणपतीचे चित्र काढणे, रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची, धावणे शर्यत, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.


विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला तसेच पारंपरिक कलेचा वारसा जपणारे लेझीमचे उत्कृष्ट व प्रभावी सादरीकरण केले. या सादरीकरणाची प्रात्यक्षिके व मार्गदर्शन शाळेतील शिक्षक दीपक बाविस्कर व सोनाली पाटील यांनी केले. गोपाळ भगत, मुख्याध्यापक मनोज भोसले, अभिष सरोदे, प्रणिता चौधरी तसेच सर्व शिक्षक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !