महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे वराडसीमला आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद
वराडसीम, ता.भुसावळ (4 सप्टेंबर 2025) : महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व झुंजार लेवा ग्रुप वराडसीम यांच्या वतीने 3 सप्टेंबर 2025 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 369 लोकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आली शिबिरामध्ये रक्तदाब, बीपी, डायबिटीस, शुगर, कार्डिओग्राम, एसीजीची तपासणी सुद्धा मोफत करण्यात आली.

आरोग्य शिबिरासाठी श्री रिदयम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व नेत्रम हॉस्पिटल, भुसावळ येथील प्रसिद्ध डॉ.मेश्राम, डॉमनिष रगडे यांनी रुग्णांची तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन केले
शिबिराच्या सुरुवातीला नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.मेश्राम यांच्याहस्ते मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले व नंतर आलेल्या सर्व मान्यवर डॉक्टर यांचे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ वराडसिम गावकरी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले व त्यानंतर आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली.
मोफत आरोग्य शिबिरासाठी महासंघाचे खान्देश विभाग संघटक विनीत पाटील (हबर्डिकर), महासंघाचे पदाधिकारी धीरज बर्हाटे, महासंघाचे वरडसहम गाव प्रमुख पराग भारंबे, अनिकेत ढाके, सागर काळे, त्रृषल खाचणे, ज्ञानराज काळे, दीपक वाणी, गौरव पाचपांडे, जयेश भारंबे, झुंजार लेवा ग्रुप व महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ वराडसिम चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




