भुसावळात शिक्षक दिनी के.एन.सी.टी.आय.संस्थेमार्फत संगणक शिक्षकांचा सत्कार


भुसावळ (5 सप्टेंबर 2025) : डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून के.नारखेडे कॉम्पुटर टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत संगणक विभागातील सर्व शिक्षक*शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर के. नारखेडे कॉम्प्युटर टेक्नोलॉजी संस्थेचे सेक्रेटरी पी. व्ही.पाटील, संस्थेचे सहसेक्रेटरी विकास पाचपांडे, संस्थेचे कार्यकारिणी सभासद प्रमोद नेमाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील व संस्थेचे भाऊसाहेब प्रमोद तळेले यांच्यासह विभागातील इतर सर्व कर्मचार्‍यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

पी.व्ही.पाटील यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत-जास्त उत्तम दर्जेदार संगणक शिक्षण देण्याचे कर्मचार्‍यांना आवाहन केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक व एस.पी.पाठक उपस्थित होते. या कार्यक्रमास के.एन.सी.टी.आय.चे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, उपाध्यक्ष किशोर नारखेडे, खजिनदार श्रीनिवास नारखेडे, कार्यकारिणी सभासद संजीव नारखेड या सर्वांनी शुभेच्छा पाठवल्या. सूत्रसंचालन सारिका भारंबे यांनी तर कार्यक्रम यादी वाचन वंदना वारके यांनी करीत आभारही मानले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !