कुर्‍हेपानाचेतील जय लक्ष्मी क्लासमध्ये शिक्षक दिन उत्साहात


Teachers’ Day is celebrated with enthusiasm at Jai Lakshmi Class in Kurhepanache कुर्‍हेपानाचे, ता.भुसावळ (7 सप्टेंबर 2025) : गावातील जय लक्ष्मी क्लासेसतर्फे 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपणहून सर्व शिक्षकांना मानाचे स्थान देऊन त्यांचा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत केले. क्लासेसचे संचालक जय फालक, संचालिका लावण्या फालक, मार्गदर्शिका सौ. पूनम पालक व शिक्षिका ममता महाजन याप्रसंगी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी नवा भारत घडवावा
पूनम फालक म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी नवा भारत घडवावा. मेहनत घ्यावी व आपल्या आई-वडिलांप्रति कृतज्ञता बाळगावी तसेच शिक्षणाचे महत्त्व समजून शिक्षणात उत्तुंग भरारी घ्यावी.


संचालक जय फलक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मी केव्हाही तयार असेल व माझ्याकडून शक्य तितके प्रयत्न मी करेल की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल. या दृष्टीनेच मी आता कार्यरत राहील.

शिक्षकांचा केला सन्मान
विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नाटीका, गीत सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रति आदरभाव व्यक्त केला. क्लासेसच्या संचालकातर्फे विद्यार्थ्यांना भेटवस्तु देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे शिक्षकांविषयीचे प्रेम पाहून त्यांना गहिवरून आले. पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !