कॅरम स्पर्धेत भुसावळातील द वर्ल्डच्या विद्यार्थ्यांचा डंका


Students of The World in Bhusawal win in carrom competition भुसावळ (8 सप्टेंबर 2025) : ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या कॅरम स्पर्धेत कोलते फॉउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमधील आठवीची विद्यार्थिनी उर्वी धनोकार तसेच नववीची विद्यार्थिनी वंशिका मट्टू यांनी अनुक्रमे 14 व 17 वयोगटात चमकदार कामगिरी केल्याने या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक सुमित दास गुप्ता व शाळेच्या क्रीडा शिक्षिका अश्विनी पाल यांनी मागर्दर्शन केले. शाळेच्या मुख्यध्यापिका पेट्रिश्या ह्यसेट तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !