जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात 3 नोव्हेंबर रोजी ‘लोकशाही दिन’
‘Democracy Day’ to be celebrated on November 3 at Jalgaon District Collectorate जळगाव (29 ऑक्टोंबर 2025) : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, 3 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी दिली.
नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबधाबाबतच्या तक्रारी घेऊन या लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



