शंभर दिवस बालविवाह मुक्त भारत अभियान
दिल्ली विधान भवनाचे विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह प्रक्षेपण
भुसावळ (10 डिसेंबर 2025) : नवी दिल्लीतील विज्ञान भवनात बाल विवाह मुक्त भारत देशव्यापी जागरूकता 100 दिवसांच्या तीव्र जागरूकता मोहिमेचा शुभारंभ ममहिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्य मंत्री सावित्री ठाकूर यांच्याहस्ते झाला.
याप्रसंगी जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन व बालविवाह मुक्त भारत अभियानाचे संस्थापक अॅड.भुवनजी ऋभू यांनी मनोगत व्यक्त केले. संपूर्ण भारतातून 300 हुन अधिक सामाजिक संस्था या अभियानाशी जुळल्या आहेत. महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी त्यांच्या मनोगतात बाल विवाह मुक्त भारत करण्यासाठी मोलाचा सहभागजस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन असलेल्या एनजीओ करत असल्याचे सांगितले.


विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह प्रक्षेणण
जळगाव जिल्ह्यात प्रक्षेपण कार्यक्रम झाला. या सहभाग नोंदविण्यात शाळा, महाविद्यालयाने चांगला सहभाग नोंदवला तसेच या मोहिमेला चांगलाच प्रतिसाद देऊन युट्युब लाईव्ह प्रदर्शन दाखवण्यात आले. यावेळी ज्ञानज्योती विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम बाविस्कर, व इतर शिक्षक खडकी, सर्वोदय हायस्कूलचे मुख्याध्यापक चौधरी, इतर शिक्षकांनी किन्ही शाळेमध्ये शपथ घेतली. यावेळी लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले. लॅपटॉप, मोबाईल तसेच प्रोजेक्टरद्वारे, मध्ये देखील दिल्ली भवन येथील सुरू असलेले लाईव्ह प्रक्षेपण शाळेतील विद्यार्थी यांना दाखवण्यात आले. आधार संस्थेच्या सर्व कर्मचारी यांनीदेखील लाईव्ह प्रदर्शनाचा सहभाग घेतला. आधार संस्थाध्यक्ष डॉ.भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद, प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, सुनील जगन हिवाळे, दीपाली सुनील हिवाळे आदींची उपस्थिती होती.







