भुसावळ विभागातील भुसावळ-अकोला खंडाची डीआरएम पुनील अग्रवालांनी केली पाहणी

सुरक्षा, पायाभूत सुविधा व अमृत भारत स्थानक योजनेच्या कामांचा आढावा


भुसावळ (8 जुलै 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) पुनील अग्रवाल यांनी वरिष्ठ विभागीय अधिकार्‍यांसमवेत भुसावळ-अकोला रेल्वे मार्गाची सविस्तर पाहणी केली.
रेल्वे संचालनातील सुरक्षितता, कार्यक्षमता, पायाभूत सुविधांची स्थिती तसेच सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान सुरक्षित, विश्वासार्ह आणि वेळेवर रेल्वे सेवा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींची तपासणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान मलकापूर येथील ट्रॅक्शन सब-स्टेशन व टीआरडी डेपोची तपासणी करून विद्युत ट्रॅक्शन यंत्रणांची कार्यस्थिती व देखभालीचा आढावा घेण्यात आला. तसेच, अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मलकापूर स्थानकाच्या पुनर्विकास कामांची प्रगती व गुणवत्तेची पाहणी करण्यात आली. याशिवाय, कि.मी. 494/25 येथील कंटिन्युइटी बाँड (उ-इेपव) ची तपासणी करून ट्रॅक सुरक्षितता, विश्वासार्हता आणि प्रतिबंधात्मक देखभालीवर भर देण्यात आला.

नांदुरा स्थानकावरील अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पुनर्विकास कामांची पाहणी करण्यात आली. यामध्ये सर्क्युलेटिंग एरिया, बुकिंग कार्यालय तसेच विविध प्रवासी सुविधांची तपासणी करण्यात आली.

तसेच कि.मी. 522/20-22 येथील समपार फाटक क्रमांक 20 ची तपासणी करून ट्रॅक व समपार फाटकावरील सुरक्षा व्यवस्था, देखभाल आणि कार्यपद्धतीची पाहणी करण्यात आली. यावेळी गेटमनशी संवाद साधून त्याच्या सुरक्षा विषयक ज्ञानाचीही पडताळणी करण्यात आली.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी अकोला व पारस स्थानकांचीही पाहणी करून प्रवासी सुविधा, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रवासी-केंद्रित रेल्वे सेवा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

या पाहणीदरम्यान विभागातील वरिष्ठ शाखा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !