मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात : दोघे ठार
Parking on Mumbai-Pune Expressway: One killed at Chowk मुंबई (8 जुलै 2026) : एर्टिगा कार व कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात दोघे ठार झाले. हा अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर घडला. दरम्यान, ठाण्यातील घोडबंदर रोडवरही अपघातात दोघे ठार झाले तर टँकरचालक घटनास्थळावरुन पसार झाला.
एक्स्प्रेसवर अपघात
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील माडप टनेल जवळ मुंबईहून पुण्याकडे जाणार्या लेनवर एर्टिगा कार कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी तर उर्वरित एक जण किरकोळ जखमी झाला. अपघातामधील जखमींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घोडबंदर रोडवर भीषण अपघात : दोघे ठार
ठाण्यातील घोडबंदर रोडवर बुधवारी दुपारी 12.45 च्या सुमारास आनंदनगर डी-मार्ट समोर गॅस टँकर रिक्षावर पलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक दशरथ पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन यांचा मृत्यू झाला, तर अमजित अन्सारी हे प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल असून क्रेनच्या मदतीने टँकर हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. सदर टेलरचा चालक हा घटनास्थळावरून पळून गेलेला असून याबाबत गुन्हा दाखल करून पुढील तपास स्थानिक पोलीस पंचनामा करून करीत आहे.