भुसावळातील रिंगरोडचे 25 वर्षानंतरही भिजत घोंगडे

जळगाव-यावल मार्गावरुन अवजड वाहतूक : 40 हजार नागरिकांचा जिव मुठीत घेवून प्रवास


The blankets on the ring road in Bhusawal are still soaking wet after 25 years भुसावळ (10 डिसेंबर 2025) : भुसावळ शहरातील जळगाव व यावल या मार्गावरील वाहतूकीचा ताण कमी व्हावा, यासाठी 1990 मध्ये रिंगरोडला मंजूरी मिळाली होती. यामुळे यावल व फैजपूरकडे जाणारी वाहतूक शहराबाहेरुन या रिंगरोडने वळवली जाणार होती. मात्र 25 वर्ष उलटूनही हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. यामुळे शहरातील यावल व जळगावरोडवरील तब्बल 40 हजार लोकवस्तीच्या भागांना रस्ता ओलांडून प्रवास करावा लागत आहे.

एक टप्पा अडीच दशकानंतरही अपूर्णच
यावल रोडवरील गजानन महाराज मंदिर ते जळगावरोडवरील लोणारी हॉलपर्यंतचा रिंगरोडचा एक टप्पा गेल्या अडीच दशकांपासून पूर्ण होऊ शकला नाही. या मार्गावरील भुमीसंपादनाचे प्रश्न रखडले आहेत. अनेक दावे न्यायप्रविष्ठ असल्याने तसेच प्रशासनाकडून यावर तोडगा निघत नसल्याने हा रस्ता तांत्रिक मुद्द्यांच्या चक्रव्युहात अडकला आहे. आता वाढत्या नागरिकीकरणाने हा रिंगरोडच शहरातील दाट लोकवस्तीत आला आहे. तब्बल 40 हजार नागरिकांना यामुळे अवजड वाहतूक होत असलेल्या रस्त्यावरुनच जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. रिंगरोडचा तिढा सोडविण्यासाठी शासनाचे सर्व विभाग व लोकप्रतिनिधी कुचकामी ठरत आहेत.



पुलाचे काम रखडले
गेल्या 25 वर्षांपासून रिंगरोडचे भिजतघोंगडे कायम आहे. यावलरोडवरील श्री. गजानन महाराज मंदिर ते भिरुड कॉलनी व जळगावरोडवरील लोणारी हॉलपर्यंतच्या रिंगरोडवर गजानन महाराज नगरच्या पश्चिम बाजूला नाल्यावर पुल उभारणी झाला मात्र काही प्लॉट व शेतांचे भुमीसंपादन झाले नाही. यामुळे या पुलावरुन वाहतूक होऊ शकत नाही. परिणामी अडीच कोटींचा निधी खर्च करुनही रिंगरोडचा वापर होत नसल्याने हा खर्च का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जळगाव रोडवरील भार वाढला
रिंगरोडमुळे यावल, रावेर व चोपड्याकडून येणारी वाहने श्री. गजानन महाराज मंदिरपासून वळवून थेट लोणारी हॉलपर्यंत जाणार होते तर व जळगावकडून येणारी वाहने याच मार्गाने जावून थेट गजानन महाराज मंदिराजवळ निघणार होती. मात्र हे काम पूर्ण न झाल्याने यावल व जळगावरोडवर अवजड वाहतूक कायम आहे. या अजवड वाहतूकीचा भार वाढला असून यामुळे रस्त्याची स्थितीही बिकट होत आहे.

रेल्वे लाईनखाली बोगदा बंदच
शहरातील यावल, जळगावरोडला जोडणारा रिंगरोड अपूर्ण आहे. यापूढील लोणारी हॉल ते रेल्वे लाईनपर्यंत जोडणार्‍या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण झाले. यामुळे हूडको व विस्तारीत भागातील किमान पाच ते सात हजार नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रेल्वे लाईनखालून मात्र बोगदा मोठा नाही. अरुंद बोगदाही वाहतूकीसाठी बंद आहे. यामुळे रिंगरोडवरुन दक्षिण भागात वाहतूक करता येत नाही.

असा सुटेल तांत्रिक तिढा
शेतकर्‍यांना पालिका भुमिसंपादनाची रक्कम देवू शकत नसेल तर त्यांना एफएसआयचा टीडीआर दिला जावा. हा टीडीआर विक्री करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळेल, मात्र नगरपालिका याबाबतही प्रतिसाद देत नाही. टीडीआर मिळाला तर हा प्रश्न लवकर सुटू शकेल. मात्र यासाठी लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !