मुंबईत ठाकरे गटाची पहिल्या तासात जोरदार मुसंडी


In Mumbai, the Thackeray group made a strong surge in the first hour मुंबई (16 जानेवारी 2026) : मुंबई महापालिकेसाठी जनमतचा एक्झिट पोल समोर आला आहे. त्यानुसार भाजप आणि शिंदे यांच्या युतीला 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज असलातरी शुक्रवारी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने आघाडी घेतल्याचे दिसून येते. ठाकरे बंधूंनी सुरुवातीच्या पहिल्या एका तासात जोरदार मुसंडी मारली आहे तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटानेही जोरदार सुरुवात केली आहे

कुणाची येणार सत्ता ?
पहिल्या एका तासात भाजप 11, शिंदेंची शिवसेना 10, शिवसेना ठाकरे गट 11, मनसे 6, काँग्रेस 5, तर इतर 3 जागांवर आघाडीवर आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागांची गरज आहे. हा आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मुंबई महानगरपालिकेत महायुतीला शह देण्यासाठी तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले.

उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरेंची मनसेने युती केली. ठाकरे बंधूंच्या या युतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिल्याने मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले तर दुसरीकडे ठाकरेंचा गड काबीज करण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र्य मैदानात उतरली तर काँग्रेस आणि वंचितने एकत्र निवडणूक लढवली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !