जळगाव महापालिकेत ललित कोल्हेंसह पूत्र पियुष कोल्हे विजयी

निकालानंतर सरिता कोल्हे भावूक : मुलाने मारली मिठी


In the Jalgaon Municipal Corporation elections, Lalit Kolhe and his son Piyush Kolhe emerged victorious. जळगाव (16 जानेवारी 2026) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेत तब्बल 22 जागांवर विजय मिळवला. विशेषतः एका गुन्ह्यात तुरूंगात असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांनी तुरुंगात राहून निवडणूक लढवली असलीतरी मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल देत त्यांना विजयी केल्या शिवाय त्यांचा पूत्र पियुष ललित कोल्हेदेखील या निवडणुकीत विजयी झाला. निकालानंतर सरिता कोल्हे व पियुष कोल्हे यांना गहिवरून आले.

विजयानंतर मुलाने मारली आईला मिठी
पियुष कोल्हे यांच्या विजयाची घोषणा होताच त्यांनी आई सरिता कोल्हे यांना मिठी मारल्याचे दिसून आले. यावेळी दोघांच्या डोळ्यातून आनंदाळू तरळले. हा जनतेचा विजय असल्याचे यावेळी सरिता कोल्हे म्हणाल्या. पती ललित कोल्हे व पियुष कोल्हे यांच्या विजयाने सरिता माळी या भावूक झाल्याचे दिसून आले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !