अल्पवयीन विद्यार्थिनीचे वासनांध शिक्षकाकडून लैंगिक शोषण


जळगाव (8 एप्रिल 2026) : वासनांध शिक्षकाने आपल्याच अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकावून गेल्या तीन वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार जळगाव जिल्ह्यातील एका गावातून समोर आला आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप दिला असून पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.

तीन वर्ष केले शोषण
राहुल अहिरे असे संशयित आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनी नववीत असताना या शिक्षकाने तिच्याशी गोड बोलून मैत्री केली. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण, तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर तिच्यासोबत काही आक्षेपार्ह फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती घालून तो 2022 पासून तर सप्टेंबर 2025 पर्यंत वारंवार तिच्याकडे शरीर संबंधांची मागणी करत अत्याचार केल्याचा आरोप आहे.


त्रास असह्य : शिक्षकाला चोपले
गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला हा शारीरिक आणि मानसिक छळ आता पीडितेसाठी असह्य झाला होता. वारंवार मिळणार्‍या धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या पीडितेने अखेर धाडस करून आपल्या कुटुंबीयांना ही आपबिती सांगितली. हे ऐकून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि विद्यार्थिनीने धरणगावमध्ये या शिक्षकाला गाठले आणि काठ्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

नराधम शिक्षकाला अटक
याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या आईने पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपी शिक्षक राहुल अहिरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !