विधान परीषदेसाठी काँग्रेसने दिली होती ऑफर : माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा गौप्यस्फोट


मुक्ताईनगर : विधान परीषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती आणि भाजपचे सहा त सात आमदार मला स्वत: क्रॉस वोटिंग करणार होते, त्यांनी स्वत: माझ्याकडे असे मान्य केले होते, असा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. विधानपरिषद निवडणुकीसाठी आश्वासन देऊनही दगाफटका झाला, त्याचे वाईट वाटत नाही परंतु निष्ठावंतांना डावलले याची खंत आहे. भाजपने तिकीट कापल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. निर्णय तर घ्यावा लागेल परंतु कोरोना संकटसमयी राजकारण करणे ठीक नाही. त्यामुळे मी ऑफर मान्य केली नाही, असेही खडसे म्हणाले.

…तर वाईट वाटले नसते
खडसे म्हणाले की, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आदी ज्येष्ठ नेत्यांसह मला विधान परीषदेवर संधी देण्याचे आश्‍वासन देण्यात आले मात्र ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, अशांना उमेदवारी देण्यात आली, याऐवजी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तर वाईट वाटले नसते, असेही खडसे म्हणाले. माझा छळ कुणी केला व मला कुणी त्रास दिला याची माहिती जनतेला असल्याचेही ते म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !