!-- afp header code starts here -->

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सावधान ! : जळगावातील वयोवृद्धाला एक कोटी 35 लाखांचा गंडा


Be cautious when investing in the stock market! : An elderly man from Jalgaon defrauded of Rs. 1.35 crore जळगाव (28 जानेवारी 2026) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर होणार्‍या फसवणुकीबाबत पोलिस व सायबर पोलिसांकडून प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जाते मात्र त्यानंतरही फसव्या आमिषाला नागरिक भाळतात व जवळील आहे नाही ते गमावून बसतात. जळगावातील वयोवृद्धाबाबतही असाच प्रकार घडला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर 50 टक्के नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील 61 वर्षीय निवृत्त व्यक्तीला तब्बल एक कोटी 35 लाख 85 हजार 189 रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सायबर पोलिसात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
तक्रारदार कमलाकर धोंडू चौधरी (वय 61, रा. तिवारी नगर, महाबळ रोड, जळगाव) हे सेवानिवृत्त आहेत. 31 ऑगस्ट 2025 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला. फिर्यादीला एका ग्रुपमध्ये अ‍ॅड केल्यानंतर सीएसट्रेड नावाचे ऑनलाइन शेअर ट्रेडिंग अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. भरलेल्या रकमेवर 50 टक्के नफा मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन आरोपींनी नफा दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

रक्कम काढताना केली फसवणूक
फिर्यादीने आपली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती रक्कम मिळवण्यासाठी वेगवेगळे टॅक्स भरण्याच्या नावाखाली आरोपींनी वेळोवेळी विविध बँक खात्यांवर एकूण एक कोटी 35 लाख 85 हजार 189 रुपये भरून घेतले मात्र कोणतीही रक्कम परत न करता त्यांची मोठी आर्थिक फसवणूक केली. फिर्यादीनुसार, कुणाल कुमार, नेहा बन्सल, आरव गुप्ता या व्यक्तींनी आणि मोबाईल क्रमांकावरून त्यांच्याशी संपर्क साधला होता. याप्रकरणी 27 जानेवारी 2026 रोजी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सायबर पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !