जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात 2 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिन


Democracy Day at the Jalgaon District Collector’s Office on February 2nd जळगाव (29 जानेवारी 2026) : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली आहे.

नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबधाबाबतच्या तक्रारी घेऊन या लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !