सावखेडासीमला शेतविहिरीत 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला


The body of a 38-year-old man was found in a farm well in Savkhedasimla यावल (31 जानेवारी 2026) : यावल तालुक्यातील सावखेडासीम गावातील रहिवासी 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह शेतविहिरीत आढळला. हा प्रकार निदर्शनास येताच तरुणाला यावल ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रशांत अशोक पाटील (38) असे मृताचे नाव आहे.

विहिरीत आढळला मृतदेह
सावखेडेसीम गावातील प्रशांत पाटील या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी रात्री गावालगत असलेल्या शेतविहिरीत आढळला. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने त्याला तेथून काढून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमित तडवी करीत आहे. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !