अर्थसंकल्प 2026 : अर्थमंत्र्यांनी केल्या या मोठ्या घोषणा


No relief regarding income tax in the budget: The Finance Minister made these major announcements नवी दिल्ली (1 फेब्रुवारी 2026) : अर्थसंकल्पात आयकरबाबत कोणतीही मोठी घोषणा झाली नसलीतरी आता 31 डिसेंबरऐवजी 31 मार्चपर्यंत सुधारित रिटर्न दाखल करता येईल तसेच परदेशात पैसे पाठवण्यावर आता 5 ऐवजी 2 टक्के कर लागणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग नववे केंद्रीय बजेट सादर केले. त्यांचे बजेट भाषण 85 मिनिटांचे होते. सीतारामन म्हणाल्या की 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर आणि 3 आयुर्वेदिक एम्स बांधले जातील. याचबरोबर, अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की कर्करोगाच्या 17 औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नसल्याचे सांगितले.

अर्थसंकल्पात झाल्या ‘या’; मोठ्या घोषणा

मालगाडीसाठी नवीन कॉरिडॉर : पश्चिम बंगालमधील डानकुनीसाठी एका नवीन फ्रेट कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांवर मोठा खर्च : पुढील आर्थिक वर्षासाठी (2026-27) 12.2 लाख कोटी रुपयांचा कॅपेक्स (भांडवली खर्च) निश्चित करण्यात आला आहे. हा मागील वर्षाच्या 11.2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

रेअर अर्थ कॉरिडॉर : केरळ, तामिळनाडू आणि ओडिशा येथे दुर्मिळ खनिजांसाठी विशेष कॉरिडॉर तयार केले जातील. यामध्ये आंध्र प्रदेशलाही जोडले जाईल जेणेकरून खनिज समृद्ध राज्यांना फायदा होईल.

टेक्सटाईल क्षेत्र : देशात मोठे टेक्सटाईल पार्क तयार केले जातील.

औषध क्षेत्रातील ‘शक्ती’: 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ‘बायो-फार्मा शक्ती’ योजना सुरू होईल, ज्या अंतर्गत तीन नवीन संस्था उघडल्या जातील

चिप उत्पादन : भारत आपले सेमीकंडक्टर मिशन 2.0 सुरू करेल.

इलेक्ट्रॉनिक्सवर भर : मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सचे सुटे भाग बनवण्यासाठी बजेट वाढवून 40,000 कोटी रुपये करण्यात आले आहे.
या 6 मोठ्या क्षेत्रांवर सरकारचे लक्ष राहील

धोरणात्मक उत्पादन : नवीन आणि आवश्यक क्षेत्रांमध्ये उत्पादन क्षमता वाढवणे

जुन्या उद्योगांना पुनरुज्जीवित करणे: जुन्या झालेल्या औद्योगिक क्षेत्रांना पुन्हा जिवंत करणे

लघु उद्योग : लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक स्तरावर अग्रेसर बनवणे

पायाभूत सुविधा: रस्ते, रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधांना प्रचंड बळकटी देणे

सुरक्षा आणि स्थिरता: देशात दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे

शहरांचा विकास: शहरांना व्यापार आणि आर्थिक केंद्र म्हणून विकसित करणे





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !