पुण्यातील भूखंड घोटाळ्यात गुन्हा दाखल करा : अंजली दमानिया


File a case in the Pune land scam: Anjali Damania पुणे (1 फेब्रुवारी 2026) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील भूखंड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

अंजली दमानिया यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या ती दिवसांत शपथविधी घ्यायला काहीच हरकत नाही, पण ‘बिझनेस अज यूज्युअल’ असल्याने पुण्यातील जमीन घोटाळ्याची चौकशी थांबवली जाऊ नये.

सरकारकडे केलेल्या मागण्या अशा
पार्थ पवारांविरोधात प्रलंबित एफआयआर तत्काळ दाखल करावी तसेच खारगे आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक केला जावा, अशी मागणी सरकारकडे दमानियांनी केली आहे.

पार्थ पवारांवर चौकशी सुरू असतानाच राज्यसभेचे खासदार बनवणे चुकीचे आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडेंवर निशाणा
अंजली दमानिया यांनी आरोप केला की, सुनेत्रा पवारांच्या मागे काही नेते संधीसाधू वृत्तीने फिरताना दिसत आहेत. विशेषत: माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उल्लेख करून त्यांनी सांगितले, धनंजय मुंडेंही सुनेत्रा पवारांच्या पुढे मागे फिरताना दिसले. संधीसाधू माणूस, परत येण्याची तडफड दिसतेय, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !