भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलच्या पारितोषिक वितरणात विद्यार्थ्यांनी सादर केल्या चित्तथरारक कसरती


At the prize distribution ceremony of Biyani Military School in Bhusawal, students performed breathtaking stunts भुसावळ (1 फेब्रुवारी 2026) : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन शनिवार, 31 रोजी उत्साहात झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले, कर्नल अभय मुखर्जी, लेफ्टनंट कर्नल संदीप सिंग, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री व मॉडेल श्रद्धा मांगले यांची खास उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध चित्तथरारक कसरती सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधले.

बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ. संगीता बियाणी विनोद बियाणी, स्मिता बियाणी, रोनक बियाणी, आयुषी बियाणी, मनीष बियाणी, राजीव पारिख, प्रवीण भराडीया, गोपाल ठाकूर, शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील, रुद्रसेन गंठीया व विविध संस्थांचे प्राचार्य उपस्थित होते.

सुरुवातीस शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथसंचलन करीत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन सह क्रीडा ज्योत पेटवून कार्यक्रमास सुरुवात झाली.याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी कर्नल अभय मुखर्जी व केदार बारबोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांची शिस्त व त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे कौतुक केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. यात हॉर्स रायडिंग, मोटर बाईक पिरॅमिड ,मुलींद्वारा प्रस्तुत प्रोग्रेसिव्ह इंडिया समूह नृत्य, सामाजिक न्यायव्यवस्थेवर आधारित हृदयस्पर्शी मराठी नाटिका, युद्ध देखावा यात पहलगाम आतंकी हमला व भारतीय सैनिकांचे ऑपरेशन सिंदूर याचे चित्त थरारक सादरीकरण हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते.तसेच मार्शल आर्ट्स, देशभक्तीपरनृत्य, भारतीयम, योगा, सामूहिक नृत्य आदीं मनोरंजक तसेच साहसी प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेच्या 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सूत्रसंचलन पर्यवेक्षक रवींद्र तायडे व हिना पटेल यांनी केले तर आभार प्राचार्य डी एम पाटील यांनी मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !