रुपाली ठोंबरेंची शंका : विमान अपघातापूर्वी एकाचवेळी दोन्ही पायलट का बदलले ?


मुंबई (1 फेब्रुवारी 2026) :उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर या अपघाताबाबत शंका-कुशंका उपस्थित केल्या जात असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी अपघाताच्या दिवशी ऐनवेळी दोन्ही पायलट का बदलले ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मग सहावा माणूस गेला कुठे ?
रुपाली ठोंबरे म्हणाल्या, आज पाच दिवस झाले, आमचा मेंदू बधीर झाला आहे. अजित पवार सकाळी आठ वाजता ज्या विमानाने येणार होते, त्याचे पायलट आणि को पायलट दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकले आणि ऐनवेळी बदलले गेले. ते का करण्यात आले? विमान खाली घेण्याची सूचना कोणी केली? आधी सहा माणसं या विमानात असल्याचे सांगितले गेले. मृत्यू पाच जणांचा झाला. मग सहावा माणूस कुठे गेला? असा प्रश्न ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे.

अडचण होती तर विमान वळवले का नाही ?
पुढे बोलताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, लँडिंगच्या वेळी अडचण असताना ते विमान खाली घेण्याची सूचना कोणी दिली? अडचण असेल तर ते विमान पुणे, सोलापूर किंवा इतर ठिकाणी उतरवायला हवे होते. मात्र तसे न करता बारामतीमध्येच का उतरवले? विमान अपघातात सगळ्या बॉडी जळाल्या, पण कागदपत्रे तशीच राहिली त्यामुळे हा अपघात आहे की त्यामागे काही कट कारस्थान आहे, याची चौकशी झालीच पाहिजे. आपण हा अपघात असल्याचे म्हणू आणि दुसरीकडे ज्याने हे कटकारस्थान केले आहे तो मोकाट सुटायला नको.

अमोल मिटकरी यांनीदेखील उपस्थित केले प्रश्न
दरम्यान, अजित पवारांचे कट्टर समर्थक अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या पाच प्रश्नांनी संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. दादा गेले हे मन मान्य करायला तयार नाही. मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप मी करणार नाही, पण प्रश्नांचा आगडोंब उसळतोय, असे म्हणत अमोल मिटकरींनी थेट अपघाताच्या ठिकाणच्या विसंगतींवर आणि तपास यंत्रणांच्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !