शिरसाड गावातील 20 वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू


20-year-old youth from Shirsad village drowns in a well. यावल (1 जुलै 2026) : यावल तालुक्यातील शिरसाड गावातील 20 वर्षीय तरुण आपल्या घरासमोरील विहिरीजवळ डोकावत असतांना त्याचा तोल जावून कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी तरुणाला तातडीने विहिरीतून काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. ही घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तोल जावून विहिरीत कोसळून मृत्यू
शिरसाड गावातील रहिवासी राजेश रमेश भिलाला (20) हा तरुण आपल्या घरासमोर असलेल्या विहिरीजवळ गेल्यानंतर डोकावत असताना तोल जाऊन विहिरीत कोसळला व पाण्यात बुडाला. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच त्याला तातडीने विहिरीतून काढून ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात रमेश भिलाला यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रोहील गणेश करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !