धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांची कामगिरी : चोरीच्या दोन दुचाकीसह संशयीत जाळ्यात


Achievement by Dhule’s Chalisgaon Road Police: Suspect nabbed with two stolen two-wheelers धुळे (1 जुलै 2026) : धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी दुचाकी चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करत विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. या कारवाईत चोरीच्या दोन मोटारसायकलींसह दोन मोबाईल मिळून एकूण एक लाख 43 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जून ते 4 जून 2026 दरम्यान साजीद अहमद शफीक अहमद सय्यद (मोगलाई साक्रीरोड, धुळे) यांची 53 हजारांची यामाहा आरएक्स-135 मोटारसायकल तसेच 25 मे रोजी नवीद अन्सार शाह (आविष्कार कॉलनी, धुळे) यांच्या घरासमोरून 50 हजार रुपये किंमतीची मारुती सुझुकी बर्गमन दुचाकी लांबवली होती. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन गुन्हे दाखल होते.



या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चाळीसगाव रोड परिसरातील दोन ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली देत वाहने काढून दिली. यामाहा दुचाकी (एम.एच.18 ई.1053) तसेच
मारुती सुझुकी बर्गमन (एम.एच.18 व्ही.6538) तसेच विवो कंपनीचे 40 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विवेक पवार, अंमलदार अविनाश वाघ, राहुल पाटील, अतीक शेख, शोएब बेग, सचिन पाटील, सिराज खाटीक, इंद्रजीत सैराट आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !